राहुलकुमार अवचट
Yavat | यवत : पुणे- सोलापूर महामार्गावरील मानकोबा वाडा फाटा (ता. दौंड) दिवसेंदिवस ॲक्सिडेंट पॉइंट बनत चालला आहे. वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर या फाट्यावर सिग्नल बसवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
पुणे- सोलापूर महामार्गावर यवत वरून सोलापूर दिशेने जात असताना कालव्या जवळ दुभाजक असून या ठिकाणी रस्ता रुंद होत आहे. परंतु दुभाजक ओलांडल्यानंतर अचानक रस्ता अरुंद होत असून या फाट्यावर गेल्या अनेक वर्षापासून दोन्ही बाजूला सिग्नल लावलेले होते. परंतु आता काही यापैकी एक सिग्नल राहिलेला नाही.
सिग्नल नसल्यामुळे वाहन चालकांना येत नाही अंदाज…
पुलावरून येताना वाहने वेगाने येतात. सिग्नल नसल्यामुळे अनेक वाहन चालकांना याचा अंदाज येत नसल्याने या दुभाजकाला धडकून अपघात होतात. असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.
शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास यवत वरून सोलापूर दिशेने जात असताना कार चालकाला दुभाजकाचा अंदाज न आल्याने गाडी थेट दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेला सोलापूर पुणे महामार्गावर गेली. सुदैवाने यावेळी कोणतेही वाहन नसल्याने मोठा अनर्थ टळाला.
या परिसरात कोठेही हायमास्ट दिवे नसल्याने संपूर्ण परिसरात अंधार पसरलेला असतो. महामार्गावर सुसाट वेगाने वाहने ये-जा करत असून याठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी महामार्ग प्रशासनाने या ठिकाणी लवकरात लवकर आवश्यक त्या उपाययोजनासह दिवे व सिग्नल बसविण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Yavat : यवत येथे जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने महात्मा फुले यांची जयंती उत्साहात साजरी..!
Yavat News | खामगाव येथील खुनातील आरोपीला गुन्हे शाखेच्या पथकाने ठोकल्या बेड्या
Yavat Crime : अवैध दारू विक्री प्रकरणी कानगाव येथील एकावर गुन्हा दाखल..!