दिनेश सोनवणे
दौंड : बेकायदेशीररीत्या मटका-जुगार अड्ड्यावर दौंड पोलिसांचा छापा टाकला आहे. तर या छाप्यात २ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर मटका चालविणाऱ्या तीन जणांच्या विरोधात दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शुभम राजू गायकवाड , अशोक सर्जेराव चव्हाण आणि जॉन रतिलाल गुंजाळ (सर्व रा.गोवा गल्ली दौंड शहर) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी रवींद्र तात्याबा काळे (पो.कॉ.ब.नं.1461 नेमणुक दौंड पोलीसठाणे) यांनी सरकार तर्फे दौंड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
दौंड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दौंड शहरातील गोवा गल्ली येथील जॉन गुंजाळ यांच्या घराच्या आडोशाला मोकळ्या जागेत कल्याण नावाचा मटका चालत असल्याची माहिती पोलिसांना एका खबऱ्या मार्फत मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुशंघाने पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला असता, आरोपी शुभम गायकवाड याच्याकडे २ हजार ५०० रुपये किमतीचा जुगाराचा माल मिळून आला. आणि आरोपी गायकवाड याने सदर काम हे मालक अशोक सर्जेराव चव्हाण व जॉन रतिलाल गुंजाळ यांच्या सांगण्यावरून केले आहे. असे पोलिसांना सांगितले आहे.
दरम्यान, रवींद्र काळे यांनी आरोपींच्या विरोधात दौंड पोलीस ठाण्यात मुंबई जुगार ऍक्ट 12 अ प्रमाने कायदेशीर फिर्याद दिली. त्यानुसार दौंड पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम 1887-12अ गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरी, पुढील तपास पोलीस हवालदार भोसले करीत आहेत.