(Pune Crime) पुणे : पुण्यात सिग्नलवर थांबलेल्या एका 29 वर्षीय तरुणीकडे पाहून तिघांनी अश्लील चाळे करत तिला फ्लाईंग किस दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना शहरातील कॅम्प परिसरात प्रसिद्ध जॉर्ज हॉटेल समोरील सिग्नलवर घडली आहे. तरुणीने जाब विचारल्यावर तिच्यासोबत वादावादी करत तिचा विनयभंग केला. ही घटना रविवारी सायंकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास घडली.
याप्रकरणी पीडित तरुणीने लष्कर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यावरून तीन अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार….!
कॅम्प परिसरातून तक्रारदार तरुणी व तिची आई जात असताना सिग्नल पडल्यामुळे त्या थांबल्या होत्या. त्यावेळी पाठीमागे दुचाकीवरून तीन तरुण आले व त्यांनी तरुणीला डोळा मारला. दरम्यान सिग्नल सुटल्यावर तरुणीची दुचाकी पुढे जात असताना त्यातील एकाने तरुणीला पाहून फ्लाईंग किसा केला. त्यानंतर तरुणीने आप ऐसे क्यू करते हो ,असे म्हणाले असता त्यांनी गाडी थांबून यांच्यासोबत वाद घातला. दरम्यान घडलेला हा प्रकार तरुणीने पोलासांना सांगतिला व तक्रार दाखल केली. पुढील तपास पोलीस करत आहेत.