दीपक खिलारे
Indapur News | इंदापूर : मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू असून, हिंदू-मुस्लिम एकतेचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या इंदापूर शहरामध्ये शुक्रवारी (ता.३१) हिंदू- मुस्लिम बांधवांनी एकत्र इफ्तार करत या वारसाला अधिक बळकटी दिली. अशाच पद्धतीने देशहितासाठी एकत्र येण्याची इच्छा यावेळी सर्वांनी व्यक्त केली.
देशहितासाठी एकत्र येण्याची इच्छा…
भाजप युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव दीपक काटे यांच्या संकल्पनेतून पार पडलेल्या या कार्यक्रमा प्रसंगी, लहुजी शक्ती सेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय जगताप, मातंग एकता आंदोलनाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष ललेंद्र शिंदे, जकात फाऊंडेशनचे अध्यक्ष आझाद पटेल, कुबा मस्जिदचे विश्वस्त अमीर इनामदार, ज्येष्ठ पत्रकार शिवाजी पवार आणि विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पवित्र रमजान महिन्याला २४ मार्चपासून सुरुवात झाली आहे. कुरआन १४४४ वर्षांपूर्वी याच महिन्यात अवतरीत झाल्याने मुस्लिम या महिन्यात रोजा ठेऊन अल्लाहप्रति आपली कृतज्ञता व्यक्त करतात. मुस्लिम बांधवांना प्रोत्साहित करण्यासाठी, तसेच पवित्र रमजानच्या शुभेच्छा देण्यासाठी भाजप नेते व भाजप युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव दीपक काटे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह दौलतनगर येथील कुबा मस्जिदला इफ्तारवेळी भेट दिली. या कार्यक्रमाने इफ्तारचा आनंद द्विगुणित झाल्याची भावना मुस्लिम बांधवांनी व्यक्त केली.
याप्रसंगी मुस्लिम बांधवांकडून मुहम्मद पैगंबर साहेबांच्या शिकवणींवर आधारित “मुहम्मद पैगंबरांचे संस्कार” नामी पुस्तक आणि गुलाबाचे पुष्प देऊन सर्वांचा सन्मान करण्यात आला.
अनेक जाती धर्मांना आपलीशी वाटणारी, तथा अनेक जाती धर्मांना आपल्यात सामावून घेणारी आपली भारतीय संस्कृती आहे. वसुधैव कुटुंबकम, अवघे विश्वची माझे घर ही हिंदू धर्माची शिकवण आपल्याला एकत्र जोडण्यास मदत करते. याच प्रेरणेतून आम्ही याठिकाणी आलो असून, एकत्र इफ्तार करण्याचा व मस्जिदला भेट देण्याचा अनुभव अनोखा व अभूतपूर्व होता. सर्व मुस्लिम बांधवांना पवित्र रमजानच्या शुभेच्छा !
– दीपक आण्णा काटे, महाराष्ट्र प्रदेश सचिव, भाजप युवा मोर्चा
रोजा/उपवासाची संकल्पना प्रत्येक धर्मात आहे. उपवास हे ईशकृतज्ञ होण्यासाठी गरजेचे असून, संस्कारक्षम व चारित्र्यसंपन्न व्यक्ती बनण्याचे ते प्रशिक्षण देतात. सर्वांचा निर्माता एकच असून, सर्व धर्मांची मुळ शिकवणही एकच आहे. त्यामुळे आपापसातील मतभेदांना मूठमाती देऊन किमान देशहितासाठी “समानो मन्त्रः समिति समानी समानं मनः सह चित्तमेषाम्।” या ऋग्वेदातील शिकवणीवर आचरण करण्याची आज गरज आहे.
– समीर सय्यद, पत्रकार, तथा कुबा मस्जिदचे इमाम
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Ramadan : रमजान पर्वास प्रारंभ, मुस्लीम बांधवामध्ये चैतन्य ! इफ्तार खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी
Indapur News |डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी शिवाजी मखरे