युनूस तांबोळी
(Shirur News ) शिरूर : पिंपरखेड ( ता. शिरूर ) येथील श्री तुकाईदेवीची यात्रा मंगळवार ( ता. ४ ) व बुधवार ( ता. ५ ) होणार असल्याची माहिती यात्रोत्सव समितीचे अध्यक्ष निवृत्ती बोंबे यांनी दिली.
बैलगाडा शर्यतीचा थरार रंगणार…!
मंगळवारी ( ता. ४ ) देवीस स्नान, मांडव डहाळेचा कार्यक्रम होईल.मिरवणूक व काठीचा कार्यक्रम होईल. यासाठी परिसरातील ढोल लेझीम पथकाने हजेरी लावावी. त्यानंतर बैलगाडा शर्यतीचा थरार रंगणार आहे.
प्रथम क्रमांकास १ लाख रूपये, व्दितीय क्रमांकास ७५ हजार रूपये, तृतीय क्रमांकास ४१ हजार रूपये, चतुर्थ क्रमांकास २५ हजार १११ रूपये इनाम ठेवण्यात आला आहे. त्याचप्रमाणे फळीफोड व घाटाच्या राज्याला बक्षीस देण्यात येणार आहे. नवीन आकर्षक घाट तयार करण्यात आला आहे.
रात्री छबीन्याचा कार्यक्रम होणार असून त्यानंतर मनोरंजनाचा लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे.
गुरूवार ( ता. ६ ) कलगी तुऱ्याचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे. यावेळी माजी खासदार शिवाजीराव आढळराव व माजी गृहमंत्री दिलिप वळसे पाटील यांची उपस्थित असणार आहे.
असे बोंबे यांनी सांगितले.