Health पुणे : हिमोग्लोबिनची पातळी जर कमी असेल तर काही लोहयुक्त पदार्थांचे सेवन करा. शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता असल्यास चक्कर येते. तसेच कोणतेही काम नीट करता येत नाही. काम करताना सतत त्रास जाणवतो. परंतु यावर काही उपाय आहेत. काही पदार्थांचा आहारात समावेश केल्यास हिमोग्लोबिन नक्कीच वाढते.
जाणून घ्या शरीरातील हिमोग्लोबिनची कमतरता दूर करणारे पदार्थ –
१) विविध प्रकारीच्या डाळी या लोह आणि प्रथिनांचा देखील उत्तम स्त्रोत आहे. एक वाटी डाळीमध्ये जवळपास ६.२५ मिली ग्रॅम लोह असते.
२) संत्रीदेखील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी मदत करते. संत्रीमध्ये व्हिटॅमिन सी आणि लोह देखील मोठ्या प्रमाणात असते.
३) खजुराच्या सेवनाने लाल रक्तपेशींची निर्मिती वाढते, परिणामी हिमोग्लोबिन वाढते.
४) दुधाला सुपरफूड म्हणतात. दुध आणि दुग्धजन्य पदार्थांचे सेवन केल्याने रक्तातील हिमोग्लोबिन वाढते.
५) पिस्त्यातील व्हिटामिन ‘बी ६’ रक्तातील हिमोग्लोबिन योग्य प्रमाणात राखण्यास मदत करतात.
६) गूळ आणि शेंगदाणे यांच्या नियमित सेवनाने रक्तातील हिमोग्लोबिन तर वाढते त्याचबरोबर शरीरात रक्ताचं प्रमाण वाढते.