सातारा : Nilam Gorhe – श्रीक्षेत्र गोंदवले तीर्थक्षेत्राच्या विकासासंदर्भात याआधीच पर्यटन विभाग आणि संबंधित मंत्र्यांशी बोलणे झाले आहे. (Nilam Gorhe ) ग्रामस्थांनी याभागाच्या विकासाकरिता सविस्तर कृती आराखडा तयार करून तो सादर करावा. याभागाच्या विकासासाठी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख, शिवसैनिक यांच्यावरती जनतेने विश्वास दाखवला तर तो आम्ही सार्थ करून दाखवू, असे मत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Nilam Gorhe ) यांनी मांडले.
डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज श्रीक्षेत्र गोंदवले देवस्थानला भेट दिली आणि दर्शन घेतले. त्यावेळी पत्रकारांशी झालेल्या संवादात त्या बोलत होत्या.
सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी आज सकाळी श्री. क्षेत्र गोंदवले येथील ब्रह्मचैतन्य श्री. गोंदवलेकर महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी डॉ. नीलम गोऱ्हे यांनी, नुकत्याच झालेल्या ‘अर्थसंकल्पीय अधिवेशनात केलेल्या कामकाजाचा अहवाल’ ब्रह्मचैतन्य श्री. गोंदवलेकर महाराजांच्या चरणी अर्पण केला.
यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना जिल्हाप्रमुख संजय भोसले, अन्य पदाधिकारी, शिवसैनिक आणि ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.यावेळी बोलताना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, श्रीक्षेत्र गोंदवले महाराज संस्थानच्या कामातून मला नेहमीच स्फूर्ती मिळते.याठिकाणी येण्याची जी प्रेरणा आहे ती याभागातील अनेक नागरिक चांगले काम करत आहेत, त्यांना ताकद देण्यासाठी आणि या भागात आणखीन जलसंधारणाची कामे करण्यासाठी हा दौरा करण्यात आला आहे.
या दौऱ्यात महिलाविषयक प्रश्न, जलसंधारण, देवस्थानचा विकास, पर्यटन, सार्वजनिक शौचालय यासंह इतर प्रश्नांबाबत प्रशासकीय अधिकारी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे स्थानिक पदाधिकारी, सरपंच, ग्रामस्थ यांसोबत बैठका घेऊन त्यावर उपाययोजना करण्यात येणार असल्याचे यावेळी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.
बीजवडी गावाला दहा लाखाचा विकासनिधी
तालुक्यातील बीजवडी गावातील ग्रामस्थांनी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन जंग्गी सत्कार केला. यावेळी बीजवडी गावाच्या विकासाकरिता उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी तात्काळ दहा लाख रुपये विकासनिधी जाहीर केला.