(Hadapsar Crime) हडपसर (पुणे) : पुणे शहरातील हडपसर येथे एका अल्पवयीन मुलीला धमकावत तिच्यावर जबरदस्ती करत बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. त्यानंतर तरुणीचे व्हिडिओ व फोटो व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी हडपसर पोलीसांनी एकास ताब्यात घेतले आहे.
सूरज संतोष पवार (वय 21) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एका अल्पवयीन मुलीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पवार याच्या विरुद्ध बलात्कार तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार…!
आरोपीने पिडीत मुलीवर जबरदस्तीने बलात्कार केला. त्यानंतर मोबाइलवर छायाचित्रे तसेच ध्वनी चित्रफित काढली. समाजमाध्यमात ती प्रसारित करण्याची धमकी देऊन त्याने तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केले. पिडीत मुलगी गर्भवती झाली. आरोपी तिला धमकावत होता. ही बाब तिने कुटुंबीयांना सांगितली. मुलीने याबाबत नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. सूरजला अटक करण्यात आली. पुढील तपास पोलीस करत आहेत.