पुणे : Nilam Gorhe – मानवी आयुष्यातील महत्त्वाची असलेल्या त्याग आणि जिद्द यां मूल्यांचा अनोखा संगम याची प्रेरणा रामायणातून सर्वांना मिळते. (Nilam Gorhe) राजकारणात काम करताना देखील याचा निश्चित उपयोग होतो. रामायणाच्या “रघुकुल रीत सदा चली आयी प्राण जाये पर वचन न जाये” या वचनाप्रमाणे राजकारणात काम करतानाही लोकांच्या भावनांचा विचार करूनच काम केले पाहिजे, असे प्रतिपादन आज विधान परिषद उपसभापती ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी येथे केले. (Nilam Gorhe)
अर्थसंकल्पीय अधिवेशनात केलेल्या कामकाजाचा अहवाल” रामनवमीच्या शुभ दिवशी श्रीरामांच्या चरणी अर्पण केला.
‘समाजाचे अनेक प्रश्न सोडविताना देखील काही प्रश्न सहज सुटतात तर काहींची उत्तरे शोधताना थोडा वेळ लागतो. मात्र समाजाच्या हितासाठी सर्वांना सकारात्मकतेचा वसा आणि धैर्य देण्याची प्रेरणा मिळावी’, अशी प्रार्थना यावेळी त्यांनी श्री राम प्रभूंच्या चरणी केली. या राम मंदिरामध्ये डॉ. गोऱ्हे यांनी नुकत्याच झालेल्या ” अर्थसंकल्पीय अधिवेशनात केलेल्या कामकाजाचा अहवाल” रामनवमीच्या शुभ दिवशी श्रीरामांच्या चरणी अर्पण केला.
आज देशभरात उत्साहाने साजरी होत असलेल्या श्री रामनवमी उत्सवाच्या निमित्ताने विधान परिषदेच्या उपसभापती ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज पुण्यामध्ये मुकुंदनगर परिसरातील दौलत राम मंदिरात आरती केली व मनोभावे दर्शन घेतले. यावेळी उपस्थित भाविकांनी त्यांचे पुष्पहार घालून स्वागत केले. त्याचबरोबर त्यांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. या विलोभनीय मंदिर परिसरामध्ये असलेल्या श्री हनुमान मंदिरातही डॉ.गोऱ्हे यांनी दर्शन घेतले.
यावेळी त्यांच्या समवेत सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते डॉ. शैलेश गुजर, शिवसेनेचे पुणे महानगरपालिकेचे माजी गटनेते अशोक हरणावळ, शहर प्रमुख गजानन थरकुडे, राजेंद्र शिळंबकर, मंदिराचे विश्वस्त पुरुषोत्तम लोहिया, राजेश शहा आणि असंख्य कार्यकर्ते व भाविक उत्साहाने उपस्थित होते.