दीपक खिलारे
इंदापूर : Indapur Crime – पुणे सोलापूर महामार्गावरून अकलूज ते इंदापूर दरम्यान अवैधरित्या गुटखा वाहतूक करणाऱ्या पिकअपवर इंदापूर पोलिसांनी (Indapur Crime) छापा कारवाई केली. पोलिसांनी पिकअपसह २४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला असून दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. (Indapur Crime)
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे
प्रकाश कुशान हेगरे (वय.२६ रा.कोकटनूर,ता. अथनी जि. बेळगाव ) व मल्लू जयश्री मेलगडे ( रा. अर्जुनगी,ता.बबलेश्वर,जि. विजापूर) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अकलूज इंदापूर मार्गावरून गुटख्याची अवैध वाहतूक होणार असल्याची गोपिनीय माहिती एका खबऱ्याकडून पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी बुधवारी (ता. २९) रात्री सापळा रचला. रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास एक संशयित पिकअप गाडी दिसून आली. या गाडीची तपसणी केली असता गाडीमध्ये महाराष्ट्रात बंदी असलेला गुटखा, विविध पानमसाले असे साहित्य मिळून आले. या कारवाईत पोलिसांनी १८ लाखांच्या गुटख्याचा २४ लाखांचा मुद्देमाल मिळून आला.
ही कारवाई पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील, योगेश लंगुटे, पोलीस हवालदार सुनील बालगुडे व पोलीस शिपाई विकास राखुंडे यांच्या पथकाने केली आहे.