राजेंद्रकुमार शेळके
पुणे : Pune News – साहित्यिकांनी केवळ मनोरंजन नाही तर समाजोपयोगी लेखन करावे, असे डॉ. अलका नाईक यांनी सांगितले. (Pune News)
कवयित्री सुलभा चव्हाण लिखित मनोमनी या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्याचे उद्घाटन नाईक यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या.
सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी प्रा.राजेंद्र सोनावणे होते. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ विभागीय संचालक डॉ. वामन नाखले, गोरेगाव विधानसभा आमदार व माजी राज्यमंत्री विद्या ठाकूर, सतिश सिन्नरकर, अलका वठारकर,पंडित वीरेन सामंत, आदी उपस्थित होते. अलका नाईक, अलका वठारकर, ज्योती कुलकर्णी, वीणा सामंत, शेखर चमनकर, रुपाली चेऊलकर, नेहा आठवले, मनोहर वठारकर यांनी स्वरचित कवितांबरोबरच मनोमनी मधील कवितांचेही सादरीकरण केले.
दरम्यान, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिमा भगत यांनी केले. तर संयोजक सुभाष चव्हाण यांनी आभार मानले.