दौंड, (पुणे) : Daund News – पाण्याच्या टाकीत डोकवत असताना तोल जाऊन एका ५ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना भांडगाव (ता. दौंड) (Daund News)येथे नुकतीच उघडकीस आली असून या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. (Daund News)
अभय रामदास दोरगे (वय- ५) असे मृत मुलाचे नाव असून त्याच्या जाण्याने कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रामदास दोरगे यांचा पोल्ट्री फार्म आहे. त्यांना दोन मुले असून यांची दोन मुले अक्षय आणी अभय घरा समोर खेळत होती. पोल्ट्री फार्मसाठी त्यांनी एक सिमेंटची पाच फूट खोल अशी पाण्याची टाकी बांधलेली आहे. त्यामुळे ही मुले खेळता खेळता पाण्याच्या टाकीकडे गेली. त्यातील लहान मुलगा अभय रामदास दोरगे हा पाण्याच्या टाकीकडे गेला.
यावेळी घरातील कोणतीच माणसे त्यांच्या सोबत नव्हती. मुलाचा पाण्याच्या टाकीकडे डोकवत असताना अचानक त्याचा तोल गेला. तोल गेल्याने तो पाण्याच्या टाकीत पाच फुटावर जोरात आपटला. त्यामुळे त्याचा जागेवरच मृत्यू झाला. मुलगा पडल्याचे समजल्यावर दोरगे यांनी घटनास्थळी धाव घेऊन मुलाला दवाखान्यात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
दरम्यान, अभय हा दोरगे यांचा छोटा मुलगा होता. सर्वात छोटा असल्याने तो सर्वांचा लाडका होता.त्याच्या अचानक जाण्याने दोरगे कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. पाण्याच्या टाकी शेजारी मुलांना खेळायला पाठवताना त्यांच्या सोबत कुणी तरी मोठी माणसं असणे गरजेचे आहे. अन्यथा मुलांना या गोष्टीचा अंदाज नसतो की आपण काय करतो ते, त्यामुळे मुले खेळत असताना त्यांच्या घरातल्या माणसाने आजूबाजूला असणे अत्यंत गरजेचे असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.