युनूस तांबोळी
शिरूर : Shirur News – श्री राम मंदिरावर विदयुत रोषणाई, रंगिबेरंगी फुलांची सजावट, अखंड हरिनाम सप्ताहात भजन, किर्तन, हरिपाठ…, विणेकरी, टाळकरी यांच्या सोबत नामस्मरण यानंतर दररोज होणारा महाप्रसाद यामुळे गेल्या आठवड्यापासून फाकटे ( ता. शिरूर ) (Shirur News) येथील श्री राम नवमी यात्रेला अखंड हरिनाम सप्ताहाने सुरवात झाल्याची माहिती येथील ग्रामस्थांनी दिली. मुख्य यांत्रा गुरूवार ( ता. ३० ) व शुक्रवार ( ता. ३१ ) रोजी आयोजीत करण्यात आली आहे. (Shirur News)
अखंड हरिनाम सप्ताह, बैलगाडा शर्यती लोकनाट्य तमाशाच्या कार्यक्रमांचे आयोजन
बुधवार ( ता. २२ ) पासून येथील अखंड हरिनाम सप्ताह कार्यक्रमाला सुरवात झाली. या साठी दररोज काकडा, हरिपाठ, प्रवचन, किर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गायनाचार्य माऊली महाराज म्हस्के, नाथा महाराज गव्हाणे, प्रांजलताई पानसरे,अशोक महाराज शिंदे, अनिताताई जाधव, नवनाथ महाराज माशेरे, संतदास महाराज मनसुख, पारस महाराज मुथ्था यांचे किर्तन आयोजीत करण्यात आले होते.
गुरूवार ( ता. ३० ) सकाळी अभीषेक, संगित भजन व मांडव डहाळे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.श्रीराम जन्माचे किर्तन व नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री श्री राम नवमी निमित्त पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी शोभेचे दारूकाम होईल.
शुक्रवार ( ता. ३१ ) बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये प्रथम क्रमाक ४१ हजार, व्दितीय क्रमांक ३१ हजार, तृतीय क्रमांक २१ हजार, चतुर्थ क्रमांक ११ हजार रूपयांचे पारितोषीत देण्यात येणार आहे. घाटाचा राजा, पायनल व इतर ही बक्षीसे देण्यात येणार आहे. यासाठी गणेश पावडे व सरपंच रेखा दरेकर यांच्या कडून सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. रात्री प्रकाश अहिरेकर सह निलेशकूमार अहिरेकर यांच्या लोकनाट्य तमाशाचे आयोजन करण्यात आले आहे. शनीवार ( ता. १ ) सकाळी हजेरीचा कार्यक्रम होईल.