पुणे : खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांचे प्रदीर्घ आजारामुळेआज बुधवारी (29 मार्च) निधन झाले. त्यांच्या जाण्याने राजकीय क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. (Girish Bapat) बापट यांनी अगदी शुन्यातून सुरुवात राजकारणात मोठ्या पदांवर पोहचले होते. बापटांची जनसामान्यांशी नाळ जुळली होती. त्यांचा दांडगा जनसंपर्क होता. अगदी समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचून त्यांनी (Girish Bapat) काम केले. त्यांनी सहा महिन्यांपूर्वी एका वृत्तवाहिनी दिलेल्या मुलाखतीत अलीकडच्या बदलेल्या राजकीय वातावरणावरुन भाजपसह सर्व पक्षांचे कान टोचले होते. ती त्यांची शेवटची मुलाखत ठरली. (Girish Bapat : said in ‘that’ last interview.)
गिरीश बापट यांच्यावर शासकीय इतमामात वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार
आज सांयकाळी सात वाजता त्यांच्यावर शासकीय इतमामात वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार असल्याचे भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी सांगितले. गिरीश बापट यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते.
गिरीश बापट यांनी शेवटची मुलाखत सहा महिन्यांपूर्वी एका वृत्तवाहिनीला दिली होती. ढासाळलेली राजकीय संस्कृती, खालावलेल्या राजकारणाच्या पातळीवर नाराजी व्यक्त केली होती.
“मी पण काही संस्थांना नुकतंच एक लाख रूपये दिली. मी पण बॅनर लावू शकलो असतो. जेवणं दिली असती, केक कापू शकलो असतो. (“I could have put up a banner too. Food would have been given..) पण असं करू नये, आपल्याकडे लोक बघत असतात. आपला आदर्श ठेवत असतात. म्हणून कार्यकर्त्यांनी नेहमी कार्यकर्त्यांच्या भूमिकेत राहावे. पक्ष त्याची नोंद घेईल. आणि सगळ्यांनाच काही प्रतिनिधित्व मिळतं, असेही नाही. जागा मर्यादित आहेत, आरक्षणं आहेत. खरा आणि निर्मळ आनंद काम करण्यात असतो. एखाद्याचं काम केलं आणि त्याच्या चेहऱ्यावर हास्य़ आलं की, आम्हाला आनंद वाटतो,” असे बापट म्हणाले होते.
राजकीय जीवनामध्ये सामाजिक, शैक्षणिक कार्य आपण करतो. समाजाच्या तळापर्यंत, शेवटच्या घटकापर्यंत पोहचणं आणि त्यांचे प्रश्न सोडवणं हे खरं काम आहे. कार्यकर्त्याचं कार्य मेलं आणि फक्त पुढारीच राहिला. हे बरोबर नाही वाटत. आम्ही सतत चाळीस वर्ष काम करत राहिलो. समाज कुठेतरी नोंद घेत असतो. आपली बांधिलकी ही समाजाशी आहे. मतांच्या राजकारणासाठी काही करत राहिलो तर ते चुकीचं आहे. फ्लेक्स लावणं, पेपरला जाहीरात दिली, जेवणं दिली. ही काय वाढदिवस साजरा करण्याची पद्धत आहे का?’ असे म्हणत त्यांनी वाढदिवस साजरा करण्याच्या पध्दतीवर देखील नाराजी व्यक्त केली होती.