अजित जगताप
वडूज : वडूज नगरीतून खटाव तालुक्यात जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर गेली काही महिन्यांपासून मोठमोठे खड्डे पडले होते. या खड्यांमुळे चार चाकी ,दुचाकी वाहन चालक यांना वाहन चालावताना कसरत करावी लागत होती. याबाबत रस्त्यावरील मोठे खड्डे बुजवा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मनसेचे सातारा जिल्हा संघटक सूरज लोहार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला होता. तत्पूर्वी, त्याची दखल घेत बाधकाम विभागाने येथील मुखः रस्त्यावरील खड्डे मुजविण्याच्या कामाला सुरुवात केली असून सर्व वाहनचालकांनीमनसेला धन्यवाद दिले आहेत.
याबाबत माहिती अशी की, सातारा जिल्ह्यातील मनसेचे आक्रमक युवा नेते व जिल्हा संघटक सूरज लोहार यांनी याबाबत वडूज येथील सार्वजनिक बांधकाम उपविभाग यांनी तालुक्यातील सर्व रस्त्यांचे खड्डे भरावेत अन्यथा महाराष्ट्र नव निर्माण सेना रस्त्यावर उतरुन आंदोलन करेल असे ठणकावून इशारा दिला होता.
याबाबत सामाजिक बांधिलकी जपत काही वृत्तपत्रांनी याची दखल घेतली होती आणि दुर्दैवाने मोटासायकलस्वाराला चार दिवसापर्वी ज्योतिबा मंदिर नजिक रस्त्यातील खड्डे व त्यात पाणी साचल्याने खड्डा दिसला नाही. त्याच ठिकाणी अपघात होऊन ज्येष्ठ महिला जखमी झाल्या होत्या. दवाखान्यात अधिक उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे खटाव तालुक्यातील वाहनचालकांनी मनसेच्या आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. तत्पूर्वीच सार्वजनिक बाधकाम विभागाने खड्डे बजविण्यास प्रारंभ केल्याने वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले आहे.
वडूज नगरीतून सातारा, पंढरपूर, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात जाण्यासाठी रस्ते आहेत, नेहमी वाहनांची वर्दळ असते. सध्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून होणाऱ्या निवडणुकीकडे राजकीय पक्षांचे लक्ष केंद्रित केले असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे, युवा नेते अमित ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मनसेचे सूरज लोहार व त्यांचे सहकारी विशाल गोडसे, अमित पंडित, महेश देसाई, निलेश लोहार, रियाज शेख, मन्सूर मुल्ला, विशाल लोहार, वैभव जाधव, सनी नवगण, मनोज माने यांनी केलेल्या सहकार्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.