(loni kalbhor )लोणी काळभोर : लोणी काळभोर (ता. हवेली) येथील विद्यार्थिनी प्रिया गंगाधर सातपुते हिने १० वीच्या पाठ्यक्रमावर आधारीत असलेल्या अभियोग्यता चाचणी परीक्षेत प्रथम तर मनस्वी प्रथमेश गायकवाड या विद्यार्थिनीने या चाचणीत द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. दोन्ही विजेत्या विद्यार्थिनींचे लोणी काळभोर परिसरातील नागरिकांकडून भरभरून कौतुक होत आहे.
३५० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग….!
वाघोली (ता. हवेली) येथील श्री रामचंद्र एज्युकेशन सोसायटीचे श्रीमती सुभद्राबाई रामचंद्र भुमकर ज्युनिअर कॉलेजच्या वतीने १० वी (एस. एस. सी. बोर्ड) पाठ्यक्रमावर आधारीत अभियोग्यता चाचणी-२०२३ या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत वाघोली, लोणीकंद, लोणी काळभोर, कदमवाकवस्ती व परिसरातील ३५० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेत लोणी काळभोर येथील न्यू इंग्लिश मेडिअम स्कूलची दहावीची विद्यार्थिनी प्रिया सातपुते हिने प्रथम क्रमांक पटकाविला. तिला विद्यालयाच्या वतीने रोख ७ हजार रुपये रोख, ट्रॉफी व प्रमाणपत्र असे बक्षीस देऊन गौरविण्यात आले. तर एंजेल हायस्कूलची दहावीची विद्यार्थिनी मनस्वी गायकवाड हिने द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. तिला ५ हजार रूपये रोख, ट्रॉफी व प्रमाणपत्र असे बक्षीस देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेचे बक्षीस वितरण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मारुती भूमकर व प्राचार्य. डी. ए धंगेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
दरम्यान, प्रिया सातपुते व मनस्वी गायकवाड या विद्यार्थिनींना न्यू इंग्लिश मेडिअम स्कूलच्या शिक्षिका शाहीन शेख यांची बहुमुल्य मार्गदर्शन मिळाले. तर या स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थिनी व शिक्षिका यांचे लोणी काळभोर परिसरातील नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.