Pune Crime News : (पुणे) : शहरात पुन्हा कोयता गॅंगने (Koyta gang) दहशत (terror) पसरविण्यास सुरुवात केली आहे. गेल्या आठवड्यापासून ( last week) वेगवेगळ्या भागात कोयता गॅंगचा (Koyta gang)उपद्रव वाढला आहे. त्यात आता जून्या वादातून तरुणावर कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना कोथरुडमधील (Kothrud) मयूर काॅलनी परिसरात घडली. या प्रकरणी सराईत गुन्हेगारांसह ( criminals along) साथीदाराविरुद्ध गुन्हा (accomplices) दाखल करण्यात आला आहे.
कुणाल सोमनाथ साळुंखे (वय २२, रा. भेलके चाळ, गुजरात काॅलनी, कोथरुड) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी साहिल ठोंबरे, आदित्य मारणे, बालाजी दळवी यांच्यासह आणखी एका साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ठोंबरे याने कोथरुड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. मारणे, दळवी , ठोंबरे, सराईत गुन्हेगार आहेत. त्यांची साळुंखे याच्याशी भांडणे झाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, साळुंखे दुपारी दीडच्या सुमारास मयूर काॅलनी परिसरातून निघाला होता. त्या वेळी आरोपी ठोंबरे, मारणे, दळवी आणि त्यांच्या बरोबर असलेल्या एका साथीदाराने साळुंखेला गाठले. त्याच्यावर कोयत्याने वार केले. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत असून गंभीर जखमी झालेल्या साळुंखेवर उपचार सुरु आहेत. पोलीस उपनिरीक्षक पवार तपास करत आहेत.
Hadapsar News : कॉलेज ऑफ फार्मसी हडपसर महाविद्यालयात ; जागतिक महिला दिन; उत्साहात साजरा..!