मुंबई : Mumbai Crime – पत्नीसोबत झालेल्या वादाचा राग मनात धरून माथेफिरूने शेजारी राहणाऱ्या ५ जणांवर चाकूहल्ला केल्याची धक्कादायक घटना मुंबईतील (Mumbai Crime) ग्रँट रोड परिसरात आज शुक्रवारी (ता.२४) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या हल्ल्यात दुर्दैवांने दोघांचा मृत्यू झाला आहे. (Mumbai Crime)
चेतन गाला (वय ५४) असे हल्ला करणाऱ्या माथेफिरुचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चेतन गाला याचे पत्नीसोबत वाद होत होते. त्यामुळे शेजाऱ्यांवर त्याचा राग होता. हा राग मनात धरून चेतन याने शेजारी राहणाऱ्यांवर चाकूने वार करीत सुटला. चेतनने पाच जणांवर हल्ला केला. या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जन गंभीर जखमी आहे. जखमींवर रिलायन्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.
दरम्यान, हल्ला केल्यानंतर आरोपी चेतन हा फरार झाला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेऊन ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.