राहुलकुमार अवचट
Rahul Kul | यवत : राज्याचे मुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची आमदार राहुल कुल ( Rahul Kul )यांनी विधानभवन परिसरामध्ये भेट घेत दौंड शहरातील प्रस्तावित कामाला वेग देण्यासाठी स्वतंत्र निधीची मागणी केली.
यावेळी दौंड शहरातील प्रस्तावित बुद्धविहार, क्रीडा संकुल, नाट्यगृह आदींच्या कामाला वेग देण्यासाठी पुरेसा निधी मिळावा, नवीन पाणी पुरवठा योजनेच्या वाढीव अंदाजपत्रकास मान्यता मिळावी, नगरोत्थान, सुवर्णजयंती महाभियान, झोपडपट्टी सुधारणा योजना, दलित वस्ती पाणीपुरवठा योजना तसेच दलित वस्ती सुधार योजना आदींच्या माध्यमातून दौंड नगरपालिकेस पुरेसा निधी उपलब्ध करून देण्याची विनंती आमदार कुल यांनी केली.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत समाविष्ट गावांमध्ये विकासकामांसाठी निधी मिळावा…
तसेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत समाविष्ट दौंड तालुक्यातील गावांमध्ये विकासकामांसाठी स्वतंत्र निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी केली, यावेळी आपल्या सर्व मागण्यांची दखल घेऊन सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन मुख्यमंत्री यांनी दिली असल्याची माहिती आमदार राहुल कुल यांनी दिली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!