Aarogya | तिळामध्ये पॉलिसॅच्युरेटेड ओमेगा-6, फायबर, आयर्न, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरससारखे शरीरासाठी पोषक असणारे घटक असतात. जाणून घ्या तीळ खाण्याचे आरोग्यवर्धक आणि सौंदर्यवर्धक फायदे –
रक्तदाब
तुम्हाला जर उच्च रक्तदाबाचा त्रास असेल तर तिळाची चक्की खा. तिळाच्या चिक्कीत ‘सेसमोलिन’ हा गुणधर्म असतो. तो रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतो.
एनर्जी मिळते
शरीराला जर एनर्जी मिळवायची असेल तर तिळाची चक्की नक्की खा. ज्यामुळे तुमच्या शरीराला लगेच एनर्जी मिळते. शिवाय थकवा दूर होतो.
त्वचेचे सौंदर्य वाढते
तीळ खाल्ल्याने त्वचा मुलायम आणि चमकदार बनते. तीळ थंडीच्या दिवसात तर नक्की खावेत. त्यामुळे त्वचा कोरडी पडत नाही.
चेहऱ्यावर नॅचरल ग्लो हवा असेल तर दुधात तीळ भिजवून त्याची पेस्ट बनवून चेहऱ्याला लावावी. तिळाच्या तेलाने मालीश केल्याने त्वचा मऊ होते.
तीळ खाल्ल्याने त्वचा मुलायम आणि चमकदार…
हाडे मजबूत बनतात
तीळ खाल्ल्याने हाडे मजबूत राहतात. कारण यात कॅल्शियम, मॅग्नेशियम भरपूर असते. हाडांच्या पोषणासाठी व बळकटीसाठी तीळ खाणे अतिशय उपयुक्त आहे. तिळामध्ये हाडांचा ठिसूळपणा कमी करणारा झिंक घटक असतो.
सांधेदुखीचा
तीळ खाल्ल्यामुळे सांधेदुखी किंवा इतर त्रास होत नाही. तिळामध्ये कॅल्शियमचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. म्हणून दिवसभरातून एकदा तरी मोठा चमचाभर तीळ खावे. त्यामुळे दातही मजबूत राहतात.
रोगप्रतिकार क्षमता
तिळामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर आणि अँटिऑक्सिडंट असतात. त्यामुळे आपले रोगप्रतिकार क्षमता वाढते.
केसांसाठी लाभदायक
नियमित तीळ किंवा तिळाचे पदार्थ खाल्ल्याने, तिळाचे तेल केसांना लावल्याने केसगळती कमी होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Health News : ओम उच्चारण केल्याने शरीराला होतात अनेक फायदे, जाणून घ्या
Health : कोणत्या वस्तू फ्रिजमध्ये ठेवल्यामुळे आरोग्यास हानीकारण ठरू शकतात ; ते पहा
Health News | साखर खाण्याची सवय सोडविण्यासाठी ;या; उपायांचा अवलंब करा