(Rahul Kul) पुणे : सायबर गुन्हे रोखण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्हास्तरावरील पोलिस ठाण्यांमध्ये प्रशिक्षित कर्मचारी नेमावे. अशी मागणी आमदार ॲड. राहुल कुल (Rahul Kul) यांनी अर्थसंकल्पीय विधानसभेत केली आहे.
सभागृहाचे लक्ष वेधले…!
दौंड तालुक्याचे आमदार ॲड. राहुल कुल (Rahul Kul) यांनी गृह विभागाच्या संबधित चर्चेवेळी पोलिस भरती प्रक्रिया पोलीस कर्मचारी, राज्यराखीव दलातील पोलिसांना वसाहतीचा प्रश्न सोडविण्यासह, राज्यात वाढत असलेले सायबर गुन्हेगारी लक्षात घेता, प्रत्येक जिल्हास्तरावर सायबर गुन्हे रोखण्यासाठी पोलिस ठाण्यांत प्रशिक्षण कर्मचारी नेमावे अशी महत्वपूर्ण मागणी करीत सभागृहाचे लक्ष वेधले.
आमदार ॲड. कुल म्हणाले की, ”पोलिस भरती प्रक्रिया तातडीने करण्याची गरज आहे, राज्य राखीव पोलीस दलातील गट ५ व गट ७ तसेच पोलीस प्रशिक्षण केंद्र असे तीन महत्वपूर्ण युनिट माझ्या मतदार संघात आहेत.” या पोलिस दलातील कर्मचाऱ्यांना आपले कर्तव्य बजावण्यासाठी आपल्या कुटुंबापासून लांब जावे लागत असताना इतर कुटुंबियांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे या सर्व कर्मचाऱ्यांच्या वसाहतींचा प्रश्न सोडवावा.
पोलिसांच्या कुटूंबियांचा विचार करून आवश्यक निवासी व पायाभूत सुविधा उपलब्ध कराव्यात, तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना फोनवरून ओटीपी पाठवून त्यामाध्यमातून आर्थिक फसवणूक करण्याचे प्रमाण व सायबर गुन्हांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हास्तरावरील सायबर सेलमध्ये प्रशिक्षित कर्मचारी नियुक्त करावेत, आदी सूचना आमदार कुल यांनी केल्या आहेत.
दरम्यान, दौंड विधानसभा मतदार संघातील प्रलंबित नवीन पाटस पोलीस ठाण्याची निर्मिती, दौंड व यवत पोलीस ठाण्याची इमारत, उपविभागीय पोलीस कार्यालयाची नवीन इमारत व पोलीस वसाहतीच्या प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आली असून त्यावर तातडीने कार्यवाही अशीही मागणी आमदार ॲड. कुल यांनी यावेळी केली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Sanjay Raut : संजय राऊत म्हणतात; राज ठाकरेही मुख्यमंत्री होऊ शकतात..!
Old Pension Scheme : संपात सहभागी होणाऱ्या शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होणार