(Pimpri Crime) पिंपरी, (पुणे) : दारुड्या मुलाने आपल्याच आईचा रस्तावर पडलेला सिमेंटचा ब्लॉक (गट्टू) उचलुन तिचे डोक्यात मारून खून केल्याची घटना (Pimpri Crime) उघडकीस आली आहे. याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट २ च्या पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे.
परेगाबाई अशोक शिंदे( वय- ५८, रा. निराधानगर, पिंपरी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे, तर विश्वास अशोक शिंदे (वय ३०) असे खून केलेल्या मुलाचे नाव आहे .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार…!
परेगाबाई शिंदे या निराधारनगर पिंपरी येथे (Pimpri Crime) राहण्यास होत्या. परेगाबाई या कचरा गोळा करण्याचे काम करून तिचे कुटूंबाचा उदरनिर्वाह करीत होत्या. तर त्यांना तीन मुले असून तिघांचीही लग्न झालेली आहेत. मुलगा विश्वास कच-याच्या घंटागाडीवर लेबर म्हणुन कामास जातो. विश्वास हा सन २०१५ पासुन खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्हयात चार वर्षे येरवडा जेलमध्ये होता. जेलमधुन सुटल्यानंतर विश्वास हा दारुचा व्यसनी झाला विनाकारण तो त्याची आई परेगाबाई हिचेशी भांडणतंटा करीत होता.
गुरुवारी (ता. ०९) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास नशेत विश्वास यास उठवण्याचा प्रयत्न केला व कामावर का जात नाही अशी विचारणा केली याचा राग येऊन त्याने कोणताही विचार न करता आई परेगाबाई हिला जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने रस्तावर पडलेला सिमेंटचा ब्लॉक (गट्टू) उचलुन तिचे डोक्यात मारला.
जिव वाचविण्यासाठी गल्लीतून पळत सुटली. विश्वास हा तिला पुन्हा मारणेसाठी तिचे मागे लागला. पळतांना परेगाबाई पायात पाय अडकुन पडली त्यावेळी तिचा आरडा ओरडा ऐकून गल्लीतील लोक जमा झाले त्यांनी तिला उचलले, पाणी पाजुन घरी नेले. लोक जमा झाल्याचे पाहून विश्वास हा दारु पिणेसाठी तेथुन निघुन गेला.
शेजारच्या लोकांना परेगाबाई व तिचा मुलगा विश्वास यांचे भांडण झाले हे माहीती होते परंतू ती पाय घसरुन पडली त्यामुळेच गंभीर जखमी झाली असा समज झाला होता. रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी डोक्यावर गंभीर मार लागुन आतील बाजुस रक्तस्त्राव झाल्यामुळे रक्त साकळल्याचे सांगितले. उपचार चालू असतांना परेगाबाई ही कोमाध्ये गेली व त्यातच ती मयत झाली.
पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक स्वामी, दिलीप चौधरी, आतिश कुडके, अजित सानप, शिवाजी मुंढे, उध्दव खेडकर यांच्या पथकाने अत्यंत कौशल्याने सखोल तपास करुन बातमीची विश्वासाहर्ता तपासुन विश्वास अशोक शिंदे हा आई मयत झाल्याचे समजताच पळुन जाण्याच्या तयारीत असतांना त्याला सापळा लावुन शिताफीने पकडले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्हयाची कबुली दिल्याने खुनाच्या गुन्हयाचा उलगडा करण्यात यश आले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Loni Kand Crime : भाडेतत्वावर कार घेऊन अपहार करणार्या आरोपीच्या लोणीकंद पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Theur Crime : थेऊर येथे ऊसाच्या पाचटाला लावली आग; दीड लाखांचे ठिबक जळाले!