Vishrantwadi Crime | पुणे : शहरासह उपनगरात घरफोडी्च्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे पोलिसांची घरफोडी करणाऱ्या चोरट्यांवर वचक राहिला नाही का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. चोरट्यांना पोलिसांचे भय राहिले नसून ते थेट पोलिसांचीच घरे फोडून चोरी करु लागले आहे. घरफोडीची एक घटना विश्रांतवाडी येथे घडल्याचे समोर आले आहे.
विश्रांतवाडी पोलीस लाईन येथील दोन पोलिसांची घरे फोडून ४२ हजार ८०० रुपयांचा ऐवज एकाने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना रविवारी (ता.१९ ) पहाटे ३ वाजता घडली आहे.
याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात पोलीस जानन चव्हाण यांनी फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी एका २० वर्षाच्या चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, फिर्यादी चव्हाण व पोलीस स्वामी राठोड त्यांच्या मुळ गावी गेले असता. चोरट्याने त्यांच्या दोघांचे घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. फिर्यादी चव्हाण यांच्या घरातील २७ हजार रुपयांचे २ तोळ्यांचे सोन्याचे दागिने चोरुन नेले. तर, स्वामी राठोड यांचे घराचे कुलूप तोडून त्यांच्या घरातील चांदीचे पैंजण, रोख रक्कम १५ हजार ८०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला.
दरम्यान याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.