उरुळी कांचन, (पुणे) : Uruli Kanchan -उरुळी कांचन (ता. हवेली) येथील डॉ. सायरस पुनावाला (Dr. Cyrus Punawala School)इंग्लिश मिडियम स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या प्राचार्या राजीकुमारी लक्ष्मी (Principal Rajikumari Lakshmi) यांना “लिंग समानता”(Conferred with National Award for “Gender Equality) पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला आहे. Uruli Kanchan
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मरणार्थ तिसऱ्या राष्ट्रीय पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मरणार्थ तिसऱ्या राष्ट्रीय पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात उरुळी कांचन येथील डॉ. सायरस पुनावाला शाळेच्या प्राचार्या राजीकुमारी लक्ष्मी यांनी शिक्षण क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना “लिंग समानता” पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
“आंतरराष्ट्रीय महिला दिन परिषद २०२३ ” साठी “सौम्यपूर्ण आणि आर्थिकदृष्ट्या शाश्वत समाजासाठी आजच्या समानतेच्या विषयावर “लिंग समानता” हा राष्ट्रीय पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार साहित्य, सेवा, क्रीडा, वैद्यकीय, कला, कला, शिक्षण या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या नागरिकांना स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात येते. शिक्षण क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल यावर्षीचा “लिंग समानता” हा शाळेच्या प्राचार्या राजीकुमारी लक्ष्मी यांना दिला आहे.
दरम्यान, डॉ. विशाखा स्मृती सोशल वेलफेअर फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य युनिटतर्फे स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आणि ३ रा राष्ट्रीय पुरस्कार कार्यक्रम व पहिल्या राष्ट्रीय महिला दिनानिमित्त विरंगणा सावित्रीबाई फुले राष्ट्रीय उत्कृष्टता पुरस्कार २०२३ हा प्राचार्या राजीकुमारी लक्ष्मी यांना प्रदान करण्यात आला आहे.
डॉ. सायरस पुनावाला शाळेच्या प्राचार्या राजीकुमारी लक्ष्मी यांना “लिंग समानता” राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक स्तरातून कौतुक होत आहे. तसेच प्राचार्या राजीकुमारी लक्ष्मी यांनी केलेल्या सर्वोत्कृष्ट कार्याबद्दल संस्थेचे सर्व विश्वस्त, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.