पुणे : Big News : कात्रज-कोंढवा रस्त्यावरील गोकुळनगर परिसरातील एका विहिरीत टेम्पोसह चालक विहीरीत (Driver with tempo falls into well) पडल्याची घटना घडली. यामुळे परिसरात एकटच गोँधळ उडाला. वेळीच अग्निशमन दला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्परतेने चालकाचा जीव वाचवला.( Lives were saved due to the promptness of the fire brigade) यामुळे मोठा अनर्थ टळला. (Big News)
बचावलेल्या टेम्पोचालकाचे नाव
विनोद पवार (वय ३५) असे बचावलेल्या टेम्पोचालकाचे नाव आहे. कात्रज-कोंढवा रस्त्यावरील गोकुळनगर परिसरात घडली. .कात्रज-कोंढवा रस्त्यावरील गोकुळनगर परिसरात पुरंदर वॉशिंग सेंटरजवळ एक जण टेम्पोसह विहिरीत पडल्याची माहिती अग्निशमन दलाच्या कात्रज केंद्राला मिळाली.
त्यानंतर अग्निशमन दलाचे केंद्रप्रमुख संजय रामटेके, बंडू गोगावले, धीरज जगताप, वसंत भिलारे, किरण पाटील, शुभम शिर्के, संकेत शेलार, यांनी घटनास्थळी धाव घेतली. विहीरीत दोर सोडण्यात आला. विहीरीत पडलेल्या टेम्पोचालकाशी जवानांनी संवाद साधून त्याला धीर दिला.
जवान विहीरीत उतरले. दोराच्या सहायाने विहिरीत पडलेल्या टेम्पोचालकाला बाहेर काढण्यात आले. टेम्पोचालक पवार याची चौकशी करण्यात आली. तेव्हा टेम्पो वॉशिंग सेंटरमध्ये आणण्यात आला होता. टेम्पो मागे घेण्यात येत असताना विहीरीत पडल्याची माहिती पवार यांनी दिली. पवार यांना किरकोळ दुखापत झाली असून जवानांनी त्वरीत मदत उपलब्ध केल्याने अनर्थ टळला.