(pune crime) पुणे : व्याजाने दिलेले पैसे दिले नाहीत तर जीवे मारेल अशी धमकी दिल्याने एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना हडपसर (pune crime ) भागात घडली असून पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे.
वैभव प्रकाश सूर्यवंशी (वय ३६, रा. सहजीवन सोसायटी, भेकराईनगर, फुरसुंगी, हडपसर) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे.
हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…!
याबाबत वैभव याची पत्नी स्नेहल (वय ३०) हिने या संदर्भात हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, हडपर पोलिसांनी वैभव यांना जीवे मारण्याची धमकी देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अतुल बाबासाहेब सूर्यवंशी (वय ३५, रा. हरपळे वस्ती, फुरसुंगी, हडपसर) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैभव याने शेअर बाजारात पैसे गुंतवणुकीसाठी आरोपी अतुल याच्याकडून दोन वर्षांपूर्वी व्याजाने पैसे घेतले होते. आर्थिक व्यवहारातून अतुलने वैभवला धमकावण्यास सुरुवात केली होती. अतुलने त्याला मारहाण केली होती.
अतुलने त्याला जीवे मारण्याची धमकी दिली होती. अतुलने दिलेल्या धमकीमुळे वैभव घाबरला होता. गेल्या काही दिवसांपासून तो नैराश्यात होता. वैभवने राहत्या घरात गळफास आत्महत्या केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तृप्ती खळदे करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Pune News : पिरंगुट येथे मोबाईल दुकानाचे उद्घाटन कालीचरण महाराज यांच्या हस्ते संपन्न!