(pune news ) पुणे : पुण्यातील कोरेगाव पार्क येथील ओशो आश्रमा बाहेर ओशोंच्या अनुयायांनी मोठी गर्दी केली होती. आचार्य रजनीश ओशो यांचा काल ७०वा संबोधी दिवस साजरा झाला. त्यानिमित्ताने आनुयायांनी आश्रमात जाण्यासाठी मोठी गर्दी केली होती. मात्र प्रशासनाने त्यांना जाण्यास मज्जव केला होता. आजही त्यांची गर्दी होती. त्यावेळी ओशोंच्या अनुयायांमध्ये आणि पोलिसांमध्ये वाद झाल्याने या अनुयायांवर लाठीचार्ज करण्यात आला आहे. यामुळे आंदोलक अनुयायी आक्रमक झाल्याची माहिती समोर आली आहे.
आश्रमाच्या मालकीवरुन त्यांचे अनुयायी गेल्या काही दिवसांपासून आंदोलन करत आहेत. त्यामुळे सातत्याने ओशो आश्रम प्रशासन आणि ओशोच्या अनुयायांमध्ये तणावाचे वातावरण आहे. अनुयायांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे बराच वेळ ओशो आश्रमात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे आश्रमाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर ओशोंचे अनुयायी आश्रमाजवळ गोळा झाल्याने परिस्थिती चिघळली, तसेच त्यांनी सुरक्षारक्षकांना डावलून आश्रमात प्रवेश केल्याने पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला. यावेळी पोलिसांनी अनेक अनुयायांना ताब्यात घेतले आहे.
ओशो यांचा काल ७०वा संबोधी दिवस साजरा झाला. या निमित्ताने जगभरातून अडीच ते तीन हजार ओशोंचे अनुयायी कोरेगाव पार्क येथील आश्रम परिसरात दाखल झाले. मोठ्या प्रमाणावर अनुयायी एकत्रित आल्याने त्यांनी ओशो आश्रमात सुरक्षारकांना डावलून प्रवेश मिळवला, त्यामुळं गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं.
नेमके काय आहे प्रकरण…!
ओशो आश्रमात भ्रष्टाचार होत असून त्याविरोध हे आंदोलन केले जात असल्याचे बोलले जात आहे. आंदोलन कर्त्या या अनुयायांना आश्रमात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून आश्रमाबाहेर आंदोलन सुरु आहे. संबोधी दिवसामुळे अनुयायी मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Gudi Padwa 2023 : पाडव्याच्या मुहूर्तावर पुणेकरांचा वाहन खरेदीचा टाॅप गियर!
Pune Crime : बिबट्याच्या हल्ल्यात गरोदर महिला जखमी ; पुण्याच्या आंबेगाव परिसरातील घटना!