पुणे : Good news : साडेतीन मुहूर्तांपैकी एक गुढीपाडवा (occasion of Padava) मानला जातो. गुढीपाडव्या (Padava) निमित्ताने नवीन वस्तू खरेदीचा लगबग सुरु आहे. शुभ मुहुर्तावर सोने-चांदी (gold and silver) खरेदीला नागरिकांची पसंती असते. अशातच नागरिकांसाठी दिलासा मिळाला आहे. पुण्यात सोनं आणि चांदीच्या दरात प्रत्येकी एक हजार रुपयांची घसरण (Fall in the price of gold) झाली आहे. त्यामुळे आता सोनं-चांदी (gold and silver) खरेदीला नागरिकांचा कसा प्रतिसाद मिळणार हे पाहावे लागणार आहे. (Good news)
पुण्यात आजचे सोन्याचे दर
पुण्यात मंगळवारी (दि.21) 24 कॅरेट सोन्याचा दर 61 हजार 079 तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 55 हजार 989 रुपये प्रति तोळा इतका होता. तर पुण्यात आज (बुधवार) 24 कॅरेज सोन्याचा दर 60 हजार 155 तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 55 हजार 142 रुपये प्रती तोळा इतका आहे. आज एक ग्रॅम 24 कॅरेटचा सोन्याचा दर 6015 तर 1 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत 5514 इतकी आहे.
पुण्यात आज चांदी 1 हजार रुपयांनी स्वस्त झाली आहे. पुण्यात आज चांदी 72 हजार रुपये प्रतीकिलो दराने विकली जात आहे. पुणे शहरातील हे सोन्याचे सर्वसाधारण दर आहेत. या किंमतीमध्ये जुरी, जकात शुल्क, राज्य कर, वाहतूक खर्च, जीएसटी या आणि इतर कारणांमुळे बदल होऊ शकतो.
सोन्याच्या संदर्भात अधिक बातम्या वाचण्यासाठी खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करा