(Nitin Gadkari) नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या नागपूर कार्यालयात मंगळवारी (ता.21) धमकी देणार फोन आला होता. फोनवरून तब्बल 10 कोटींची खंडणीची मागणी करण्यात आली होती. यामुळे चांगलीच खळबळ उडाली होती. या प्रकरणी पोलिसांनी तपासादरम्यान एका संशयित तरुणीला ताब्यात घेतले आहे.
तरुणीला मंगळुरु पोलिसांनी चौकशीसाठी घेतले ताब्यात…!
मंत्री गडकरी यांना धमकीचा फोन आल्यानंतर कसून तपास सुरु करण्यात आला आहे. त्या दरम्यान तपास यंत्रणांनी फोन करणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरु केला. दरम्यान, या प्रकरणात एका तरुणीला मंगळुरु पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. तर नागपूर पोलिसांचे एक पथक तात्काळ कर्नाटकला रवाना झाले आहेत. या प्रकरणात नागपूरातल्या धंतोली पोलीस ठाण्यात
जीवे मारण्याची धमकी तसेच खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणीला ताब्यात घेतल्या नंतर याधमकी प्रकरणाची काय माहिती समोर येणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
पाचगणीचे वास्तुविशारद नितीन भिलारे मोस्ट प्रॉमिसिंग उद्योजक आणि डिझायनर पुरस्काराने सन्मानित!
Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकी ; 10 कोटींची खंडणीची केली मागणी!
धनगर समाजातील पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश; समाजकल्याण आयुक्त नितीन उबाळे