(Shikrapur Crime ) शिक्रापूर, (पुणे) : शिक्रापूर पोलीस ठाण्यातील पोलिस कर्मचारी जितेंद्र ऊर्फ हरिभाऊ केशव मांडगे (वय-३६) यांच्या आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी
पत्नी, सासरे, व मेहुण्यावर रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांनाही ताब्यात घेतले आहे.
याबाबत जितेंद्र ऊर्फ हरिभाऊ मांडगे यांची बहिण मनिषा इथापे यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पोलिसांनी पुजा जितेंद्र उर्फ हरीभाऊ मांडगे (वय-२७), सासरे संजय बबन दळवी (वय – ५३), मेहुणा शशांक संजय दळवी (वय-२९) रा. सर्वजन पारनेर, जि. अहमदनगर) अशी अटक करण्यात आलेल्या तिघा आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार…!
जितेंद्र ऊर्फ हरिभाऊ मांडगे यांनी बुधवारी (ता. १५) कारेगाव येथील नवलेमळा येथे एका शेतातील विहीरीवरील लोखंडी राहटाला दोरीने गळफास घेत आत्महत्या केली होती. सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली होती.
जितेंद्र हे शिक्रापुर पोलिस स्टेशन येथे नेमणुकीस असताना त्यांच्यावर सुपा पोलीस ठाणे, ता. पारनेर, जि. अहमदनगर येथे वेगवेगळे दखलपात्र गुन्हे दाखल आहेत. अटकेच्या भीतीने तसेच मांडगे यांची पत्नी पुजा हिने घटस्फोट घेण्यासाठी ३६ लाख रुपये तसेच ७ एकर जमिनीची मागणी केली होती.
दरम्यान, जितेंद्र मांडगे यांचा शारीरिक व मानसिक छळ करुन त्यांना गळफास घेऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याच्या आरोपीखाली, त्यांच्या पत्नीसह, सासरा व मेहुणा यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विनोद शिंदे करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Politics News : काँग्रेस केवळ घोषणा करणार पक्ष ; उदयनराजे भोसले
Gudi Padwa 2023 : पाडव्याच्या मुहूर्तावर पुणेकरांचा वाहन खरेदीचा टाॅप गियर!