(Pimpri News) पिंपरी : पिंपरी-चिंचवड (Pimpri News) महानगरपालिकेतील निविदा विभागातील लिपिकाला १ लाखाची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.
दिलीप भावशिंग आडे (वय ५१, पद-अनुरेखक, निविदा विभागातील लिपिक, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी, पुणे) असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी एका ३४ वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार…!
तक्रारदार हे पिंपरी चिंचवड महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाचे देखभाल व दुरुस्तीचे कामे करतात. तक्रारदार यांना हे काम शासकीय निविदेनुसार काम मिळाले आहे. सदर कामाच्या वर्क ऑर्डरची फाईल तयार करुन संबंधीत विभागाकडे पाठविण्यासाठी, मोबदला म्हणून आरोपी लोकसेवक दिलीप आडे यांनी १ लाख ५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याप्रकरणी तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
सदर तक्रारीची पडताळणी केली असता, आरोपी लोकसेवक दिलीप आडे यांनी तक्रारदार यांच्याकडे १ लाख ५ हजार रुपयांच्या लेचेची मागणी करून तडजोडीअंती १ लाख रुपयांची लाच स्वीकारताना आरोपी लोकसेवक आडे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुढील तपास पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक प्रविण निंबाळकर करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस उप आयुक्त/ पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे .
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Pimpri Chinchwad Crime : कुख्यात गुंड बाळा वाघेरेच्या चिंचवड पोलिसांनी आवळल्या मुसक्या