(Health News) पुणे : श्वसनाच्या व्यायामामध्ये ओम उच्चारण करण्याचा व्यायाम केला तर, अधिक फायदे होतात.
जाणून घ्या ओम उच्चारण करण्याचे फायदे –
मन अशांत आणि अस्वस्थ वाटत असेल किंवा ओम उच्चारण केल्याने मनातील भीती कमी होते.
सकाळी उठल्यानंतर जो थकवा वा अशक्तपणा जाणवतो तो ओमचा उच्चार केल्याने दूर होते.
शरीराला भरपूर ऑक्सिजन मिळतो. तसेच रक्ताभिसरणही चांगले होते.
ओम उच्चारणामुळे गळ्यामध्ये कंपने निर्माण होतात. याचा थायरॉईड ग्रंथींवर सकारात्मक परिणाम होतो.
नियमितपणे ओम उच्चारण केल्याने संपूर्ण शरीरात कंपने तयार होतात. या कंपनांचा पाठीच्या कण्यावर सकारात्मक परिणाम होऊन त्यांची क्षमता अधिक वाढते. ओम उच्चारण करताना ताठ बसतात. त्यामुळे पाठीच्या स्नायूंना अराम मिळतो तसेच मणका मजबूत होतो.
ओमचा उच्चार केल्याने पोटाचं कंपन होते. तसेच त्यामुळे डायजेशन चांगल्या रीतीने होते.
ओमचा उच्चार केल्याने आपल्या शरीरात एक पॉझिटिव्ह ऊर्जा संचारते. चेहरा फ्रेश होतो. शिवाय आपला मूडही चांगला बनतो. तणाव दूर होतो.
झोपण्यापूर्वी ओम उच्चारण करा. नियमितपणे ओम उच्चारण केल्याने मन आणि शरीर तणावमुक्त होते आणि नक्कीच शांत झोप लागते.
ओम उच्चारण नियमित केल्याने एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Health News : शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी आमचूर पावडर उपयोगी!
Beauty Tips : मुलायम आणि चमकदार त्वचा बनविण्यासाठी गुलाब फायदेशीर, जाणून घ्या कसा करावा वापर!
Festival News | गुढीपाडवा अवघ्या दोन दिवसांवर ; बाजार पेठेत खरेदीची लगबग!