पुणे : Pune Crime : सायबर चोरट्यांचे (Cyber Thieves’ Prowess) प्रताप दिवसेंदिवस वाढतच चालले असून, एका व्यक्तीला लष्करात नोकरीस असल्याची बतावणीकरून गुगल पेद्वारे २२ हजारांना गंडा (Ganda) घातला आहे. त्यांना फ्लॅट भाड्याने हवा असल्याचे सांगत त्याचा अॅडव्हान्स देण्यासाठी म्हणून त्यांना गुगल पेमधील बँक ट्रान्सफर ऑपशन वापरण्यास सांगितले. त्यावरून कोड घेतला व त्यांच्याच खात्यातून २२ हजार रुपये ट्रान्सफकरून फसवणूक केली. (Pune Crime) Cyber Thieves’ Prowess; Ganda pretended to be employed in the army…
याप्रकणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात ४८ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. त्यावरून अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचा एक फ्लॅट भाड्याने द्यायचा होता. त्याबाबत त्यांनी माहिती टाकलेली होती. यादरम्यान, एका अनोळखी क्रमांकावरून त्यांना फोन आला व फ्लॅट भाड्याने हवा असल्याची माहिती दिली. मी लष्करात नोकरीस असल्याचे सांगत त्याने व्हॉट्सअपला बनावट ओळखपत्रही पाठविले. त्यामुळे तक्रारदारांचा विश्वास बसला. त्यानंतर त्याने २० हजार रुपये डिपॉझिट व २ हजार रुपये भाडे पाठवितो असे सांगत त्यांना गुगल पेमधील बँक ट्रान्सफर ऑपशन सुरू करण्यास सांगितले. त्यांनी ते सुरू करताच त्यांचा आयडीएफसी कोड घेतला आणि त्याद्वारे तक्रारदार यांच्या बँक खात्यातील २२ हजार रुपये ट्रान्सफरकरून फसवणूक केली. पुढील तपास पोलीस करत आहेत.