PMPML | पुणे : निगडी डेपोमधील एका पीएमपीएमएल (PMPL) बस चालकाने मोबाईलवर सिनेमा पाहत गाडी चालवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे प्रावाशांच्या सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तर आता अशा पद्धतीने बस चालविणाऱ्या बसचालकांवर ‘पीएमपी’ प्रशासन काय कारवाई करणार, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
सदर घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे…
प्रवाशांच्या सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर…!
निगडी डेपोचा एका चालक बस चालविताना थेट मोबाइलवर सिनेमा पाहत असल्याचे आढळून आले आहे. त्या गाडीमधल्याच एका प्रवाशाने हा व्हिडीओ शूट केला. आणि हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. नागरिकांमधून या घटनेचा संताप व्यक्त होत असून या चालकावर कारवाई करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
दरम्यान, ‘पीएमपी’चे बरेच चालक बस चालविताना गळ्यात हेडफोन व खिशात मोबाइल बाळगतात. काही वेळा फोन आल्यानंतर ते उचलून बोलत असल्याच्या तक्रारी प्रवाशांनी केल्या आहेत. फोनवर बोलत असताना मोठी दुर्घटना घडू शकते. त्यामुळे बस चालविताना चालकाला गळ्यात हेडफोन व मोबाइल बाळगण्यास मनाई करावी, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.