(Satara Crime) सातारा : पाटण तालुक्यातील (Satara Crime) मोरणा खोऱ्यातील गुरेघर धरण परिसरात काल (रविवारी) झालेल्या गोळीबारात दोन जणांचा मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. या गोळीबार प्रकरणी संशयित म्हणून ठाण्याचा माजी नगरसेवक मदन कदम याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
जखमी झालेल्यांवर कऱ्हाड येथे उपचार…!
श्रीरंग लक्ष्मण जाधव (वय ४७) सतीश बाळासाहेब सावंत ( वय ३५ वर्षे रा. कोरडेवाडी, सातारा) या दोघांचा या घटनेत मृत्यू झाला. तर प्रकाश लक्ष्मण जाधव यांना गोळी लागल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत . त्यांच्यावर कऱ्हाड येथे उपचार सुरू आहेत. मात्र त्यांचीही प्रकृती अत्यवस्थ आहे.
ठाण्याचा माजी नगरसेवक व शिवसेनेचा माजी संपर्कप्रमुख मदन कदम याने हा गोळीबार केल्याचा संशय आहे. धरण परिसरातील नागरिकांनी कदम याच्या घराला वेढा घातला होता. त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत त्याला ताब्यात घेतले.
पवनचक्कीच्या पैशाच्या व्यवहारामधून हा गोळीबार झाल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान मृत व्यक्तीपैकी एकजण हा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या निकटचा कार्यकर्ता असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर पाटण तालुक्यात तणावाचे वातावरण आहे.
मदन कदम हा मल्हारपेठ येथील रहिवासी व ठाण्याचा माजी नगरसेवक असून गुरेघर गावात त्याची शेती आहे. त्याच्या मुलाने दोन दिवसांपूर्वी एका किरकोळ अपघातात गावातील गाडीच्या काचा फोडल्या. ही भांडणे मिटविण्यासाठी कदम याने या सर्वांना शेतात बोलवले होते. या ठिकाणी फायरिंग झाल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Pune Crime News | अकाऊंटंटकडून रांका ज्वेलर्सची फसवणूक ; तब्बल 1 कोटी 6 लाखांना घातला गंडा!