राहुलकुमार अवचट
यवत – भारतीय स्वातंत्र्य अमृतमहोत्सवी कार्यक्रमानिमित्त पर्यावरण जागर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य व ग्रामपंचायत मिरवडी यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार (ता. ३०) रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर माध्यमिक विध्यालय मिरवडी येथे सर्व विद्यार्थ्यांना आंबा , चिंच ,पेरू, जांभूळ अशे प्रत्येकी एक फळझाड म्हणून वृक्षदान करण्यात आले.
यावेळी विध्यार्थ्यांना झाड लावून फोटो वर्ग शिक्षकांकडे पाठवून पुढच्या वर्षी सर्वेक्षण करून प्रथम तीन मुलांना विशेष देखभाल साठी प्रोत्साहित म्हणून एक हजार रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. तसेच या मुलांकडून वृक्ष प्रतिज्ञा घेण्यात आली.
या वेळी सरपंच , सदस्य ,चेअरमन ,व्हा.चेअरमन, शिक्षक, संचालक , शाळा अध्यक्ष व आजी माजी पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.