(Pune Crime) पुणे : आंबेगाव परिसरात (Pune Crime) बिबट्याचा वावर चांगलाच वाढलेला आहे. रात्रीच नव्हे तर दिवसाही येथील नागरिकांना जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत आहे. दुचाकीवरून घरी जाणाऱ्या दाम्पत्यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली. या बिबट्याच्या हल्ल्यात गरोदर महिला जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.
आंबेगाव तालुक्यातील चांदोली परिसरातील घटना…!
शनिवारी रात्री आंबेगाव तालुक्यातील चांदोली परिसरात ही घटना घडली. छाया आत्मराम राठोड असे या महिलेचे नाव असून ती गरोदर असल्याची माहिती आहे.
या बाबतचे वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिले आहे.
वृत्तात माहिती दिल्यानुसार छाया राठोड आणि त्यांचे पती उसतोडणी कामगार आहे. शनिवारी दोघेही उस तोडणीसाठी मंचर येथे गेले होते. मात्र, रात्री मंचरहून घरी परतताना पुणे-नाशिक महामार्गावर असलेल्या आंबेगाव तालुक्यातील चांदोली परिसरात बिबट्याने उसाच्या शेतातून उडी मारत त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात छाया राठोड यांच्या हातापायला दुखापत झाली. तसेच त्यांच्या पतीलाही थोडा मार लागला. या घटनेनंतर स्थानिकांनी तत्काळ राठोड यांना रुग्णालयात दाखल केले.
छाया राठोड यांची प्रकृती आता ठीक असल्याची माहिती मंचरच्या रेंज फॉरेस्ट ऑफिसर स्मिता राजहंस यांनी दिली. तसेच आम्ही या भागात बिबट्याच्या वाढत्या हल्याच्या पार्श्वभूमीवर आम्ही कामगारांना आवश्यक सुचना दिल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले. याबरोबरच या परिसरात आम्ही गस्त वाढली असल्याचेही त्या म्हणाल्या.
दरम्यान, गेल्या काही दिवसांत पुणे-नाशिक महामार्गावर असलेल्या आंबेगाव तालुक्यातील चांदोली परिसरात बिबट्याने हल्ला केल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. फेब्रवारी महिन्यातही बिबट्याने दुचाकीस्वार दाम्पत्यावर हल्ला केल्याची घटना घडली होती. दैव बलवत्तर हाेते दुचाकीस्वार दाम्पत्य बचावले होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Pune Crime : बलात्काराच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला खडकी पोलिसांनी ठोकल्या बेड्या!