राहुलकुमार अवचट
यवत – जनाई शिरसाई उपसा सिंचन योजेनचे पाणी रोटी गावाला पोहचल्यानंतर दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या हस्ते पुजन
करण्यात आले.
दौंड, पुरंदर आणि बारामती तालुक्यातील कायमस्वरूपी दुष्काळी भागातील सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्याच्या उद्दिष्टाने कोट्यवधी रुपये खर्च करून पुरंदर उपसा सिंचन व जनाई-शिरसाई सिंचन योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. परंतु, ही योजना सुरू होऊनसुद्धा दौंडच्या दक्षिणेकडील भागातील अनेक गावे अद्यापही पाण्यापासून वंचित आहे. वर्षानुवर्षे शासनाची उदासीनपणा व नियोजना अभावी योजना हि कुचकामी ठरत आहे. हे तितकेच खरे असले तरी तरुणांनी मनावर घेतले. आणि लोकांचा सक्रिय सहभाग मिळाल्यास कुठलाही प्रश्न मार्गी लागू शकतो. याचे उदाहरण (रोटी, ता. दौंड) येथील माझ्या युवा सहकाऱ्यांनी दाखवून दिले आहे.
रोटी गावास जनाई शिरसाई उपसा सिंचन योजेनचे पाणी मिळावे यासाठी गावातील तरुणांनी एकत्र येत लोकसहभागातून या कालव्याच्या दुरुस्तीचा निर्णय घेतला व याकामी सहकार्याची मागणी आमदार राहुलदादा कुल यांचेकडे केली व त्यानुसार पुणे पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता हनुमंत गुणाले यांच्याकडे पाठपुरावा करून उपविभागीय अभियंता, जनाई शिरसाई उपसा सिंचन व्यवस्थापन उपविभाग दौंड यांच्याशी मे महिन्यामध्ये बैठक घेतली. या बैठकीमध्ये हिंगणी गाड़ा शाखा कालवा दुरुस्त करण्यासाठी जलसंपदा विभागाद्वारे आवश्यक यंत्रणा व तांत्रिक सहकार्य करावे असे निर्देश आमदार राहुलदादा कुल यांनी दिले. व तद्नुसार दिनांक १५/०५/२०२२ रोजी जलसंपदा विभागाद्वारे पोकलेन मशीन उपलब्ध करून कालवा दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले.
जनाई शिरसाई उपसा सिंचन योजेनचे पाणी रोटी गावाला मिळावे. यासाठी हिंगणी गाडा शाखा अंतर्गत असलेल्या सुमारे ९ किमी लांबीच्या कालव्याच्या दुरुस्तीचे काम लोकसहभाग व श्रमदानातून करण्याचा निर्णय गावातील तरुणांनी घेतला व याकामी दौंड चे आमदार राहुल दादा कुल यांनी पाटबंधारे विभागाशी पाठपुरावा करून आवश्यक यंत्रणा व तांत्रिक सहकार्य उपलब्ध करून दिले.
दरम्यान, ग्रामस्थांचे सामूहिक प्रयत्न व मागील ३ महिन्यांच्या अथक परिश्रमातून कालव्याच्या दुरुस्तीचे काम पूर्ण होऊन जनाई शिरसाई उपसा सिंचन योजेनचे पाणी मौजे रोटी येथे पोहचले. यावेळी आमदार राहुलदादा कुल यांच्या हस्ते जल पूजन पार पडले.