दिनेश सोनवणे
दौंड – आगामी दौंड नगरपालिका महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वबळावर लढवणार असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सुधीर पाटसकर यांनी केले आहे. पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आगामी नगरपालिका स्वबळावर लढवण्यासाठी तयारीला लागा असा आदेश दिले आहेत. अशी माहिती मनसेचे तालुका सचिन कुलथे यांनी दिली आहे.
दौंड शहराचा सर्वांगीण विकास या दोन्ही गटामुळे कोळंब आहे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करून धडकन नागरिकांना वेठीस धरले आहे. दौंड शहराची वाट या दोन्ही गटाने जाणून-बुजून लावली आहे. कुठलेही ठोस काम किंवा सांगण्यासारखे काम या दोन्ही गटाने दौंड शहरांमध्ये केले नाही.
किंबहुना दौंड शहरांमध्ये सर्वसामान्य लोकांना कुठल्या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या नाहीत. परत आपणच कसे श्रेष्ठ आहोत असे सांगण्याचा आणि बसवण्याचा प्रयत्न हे दोन्ही गट करत असतात आगामी दौंड शहरामध्ये महिलांसाठी किंवा पुरुषांसाठी स्वच्छतागृह सुद्धा उपलब्ध करून दिले नाही.
तीस तीस वर्षे नगरपालिकेत आपण सत्तेत आहोत किंवा सत्तेच्या बाहेर विरोधी पक्ष आहोत तरी देखील साध्या स्वच्छता ग्रह सुद्धा यांनी बांधून दिले नाहीत इतकी वाईट अवस्था केली आहे. दौंड चे नागरिक सुद्धा सुजाण आहेत आगामी काळामध्ये निश्चित दौंडकर मतदार परिवर्तन घडवतील हा आशावाद कुलथे यांनी व्यक्त केला आहे.
यावेळी दौंड शहराध्यक्षपदी संदीप बोराडे यांची नियुक्ती सुधीर पाटसकर यांनी पत्र देऊन त्यांची नियुक्ती केली. सागर पाटसकर पुणे जिल्हा उपाध्यक्ष त्याच बरोबर प्रतिभा डेंगळे महिला आघाडी पुणे जिल्हाध्यक्ष यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.अभिजीत गुधाटे मंगेश साठे ,राजू चातु ,अझर कुरेशी नंदकिशोर मंत्री, सुरेखा बगाडे, लता बगाडे ,आदेश धीरडकर ,प्रज्योत वाघमोडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.