Hinjewadi News | पुणे : हिंजवडी (Hinjewadi) भागातील फेज थ्रीमधील एका इमारतीच्या पर्किंगमध्ये घुसून बिबट्याने पाळीव कुत्र्याची शिकार केल्याची घटना काल गुरुवारी (ता.१६) मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे या भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. तर सध्या बिबट्याने कुत्र्याची शिकार केलेला व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हिंजवाडी फेज थ्री पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या नेरे गावातील शिंदे वस्तीतील ही घटना आहे. संभाजी जाधव यांचे शिंदे वस्तीत घर आहे. त्यानी घरात बांधून ठेवलेल्या कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केला. कुत्रा आपला जीव वाचवण्याचा खूप प्रयत्न करत होता. परंतु बिबट्यापुढे त्याचे प्रयत्न अपूर्ण पडले. चैनने बांधलेल्या कुत्र्याला बिबट्याने ओढून नेले. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांच्या मनात भीती बघावयास मिळाली आहे.
वन विभागाने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा…
बिबट्याचा मागील तीन वर्षांपासून अधिक काळ नेरे, जांबे आणि कासारसाई भागामध्ये खुलेआम वावर आहे. यामुळे भागामधील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा. अशी मागणी या भागातील स्थानिक नागरिक करत आहे.
दरम्यान, मानव आणि बिबट्या यांच्यांत संघर्ष सुरु असतो. जंगलात खाद्य मिळत नसल्यामुळे बिबटे अनेक ठिकाणी शहराकडे आपला मोर्चा वळवत आहे. आता आयटी सीटी अशी ओळख असलेल्या पुण्यातील हिंजवडी भागातील फेज थ्रीमध्ये पुन्हा एकदा बिबट्याची दहशत पाहायला मिळाली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
Beauty Tips : मुलायम आणि चमकदार त्वचा बनविण्यासाठी गुलाब फायदेशीर, जाणून घ्या कसा करावा वापर
Breaking News : रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! आजपासून दौंड-सोलापूर नवीन डेमो सुरु
Ajit Pawar | दूध भेसळीच्या मुद्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार आक्रमक