Sucide News | पुणे : पुणे जिल्ह्यातील मावळ मधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका सेवा निवृत्त परिचारिकेने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली आहे. तळेगाव दाभाडे शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे ही महिला नर्स होती. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
आशा हिंगणे सोनवणे असे आत्महत्या केलेल्या परिचारिकेचे नाव आहे. या घटनेची तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. वन्यजीव रक्षकचे निलेश गराडे यांनी याबाबत माहिती दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, महिला तळेगावातील पंचवटी कॉलनी भागात राहत होत्या. शुक्रवार ( दिनांक 17 मार्च ) रोजी सकाळच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरी त्यांचा मृतदेह आठळला. त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी दिसत असून पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलिस करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
Big Breaking : पुण्यात ईडीची छापेमारी सुरु, बिल्डर्स ; कॉन्ट्रॅक्टरचे धाबे दणाणले
Baramati Crime News : अपघातात मयत झालेल्या ७० वर्षीय वडिलांच्या विरोधात मुलाची पोलीस ठाण्यात तक्रार
Sassoon Hospital : आरोग्य व्यवस्थेवर ताण ! ससून रुग्णालयाने घेतला;हा’ महत्वाचा निर्णय