(Shikrapur Crime) पुणे : नातेवाईकाल फोन करुन मी आत्महत्या करत आहे, अशी माहिती देत शिक्रापूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.
दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या…!
पोलीस शिपाई जितेंद्र केशव मांडगे असे आत्महत्या केलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. बुधवारी सायंकाळच्या सुमारास शिरूर जवळील नवले मळा येथील विहिरीच्या रहाटस दोरीच्या साहाय्याने गळफास घेतल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मांडगे यांनी गळफास घेण्यापूर्वी एका नातेवाईकाला फोन करून मी आत्महत्या करत आहे. असे सांगिले होते. काही वेळातच संबंधित ठिकाणी तो तरुण गेला असता त्यांना जितेंद्र मांडगे यांनी विहिरीच्या रहाटस गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले.
दरम्यान काही नागरिकांनी त्यांना उपचारासाठी शिरूर येथील माणिकचंद हॉस्पिटलमध्ये नेले असता, तेथील डॉक्टरांनी जितेंद्र उर्फ हरिभाऊ केशव मांडगे यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. तर जितेंद्र मांडगे यांनी वैयक्तिक टेन्शन मधून गळफास घेतला असल्याचे बोलले जात आहे.
मात्र या घटनेमुळे पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे. या घटनेची शिरूर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास शिरूर पोलीस करत आहेत.