Pune Crime News : पुणे : रेन्टने कार बुक करणे एका तरुणाला चांगलेच महागात (Expensive) पडले असून, सायबर चोरट्यांनी (Cyber Thieves) तब्बल अडीच लाख रुपयांना गंडा (stolen) घातला आहे. तरूणाला एक अॅप डाऊनलोड (Download) करण्यास सांगून त्यावरून कार बुककरून १०० रुपये पाठविण्यास सांगितले. परंतु, त्यांनी १०० रुपये पाठविताच त्यांच्या खात्यातून (from the account) चोरट्यांनी ऑनलाईन ट्रान्सफर (Online Transfer) करून फसवणूक केली.
याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल
याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात ४६ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. त्यावरून अनोळखी मोबाईल धारक व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार आंबेगाव बुद्रुक परिसरात राहण्यास असून, त्यांना रेन्टवर कार हवी होती. त्यांनी माहिती घेत असतानाच त्यांना आरोपीने संपर्क केला.
दरम्यान, त्याने एक लिंक पाठविली. त्यावरून एक अॅप डाऊनलोड करण्यास सांगत त्यावरून शंभर रुपये पाठविण्यास सांगितले. त्यांनी शंभर रुपये क्रेडिट कार्डच्या डिटेल्स टाकून भरल्यानंतर सायबर चोरट्यांनी त्यांच्या खात्यातून २ लाख ४४ हजार रुपये ऑनलाईन ट्रान्सफरकरून फसवणूक केली. पुढील तपास पोलीस करत आहेत.