दीपक खिलारे
Harshwardhan Patil | इंदापूर : सणसर रायते मळा येथे सोमवारी रात्री निरा डावा कालव्याच्या मोरीला भगदाड पडून झालेल्या नुकसानीचे पंचनामे व दुरुस्ती संदर्भात जलसंपदाचे अधिकारी व महसूलच्या अधिकाऱ्यांना भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshwardhan Patil) यांनी सूचना दिल्या.
जलसंपदाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मोरीच्या भगदाडातून वाहणारे पाणी इतरत्र वळवून पूर्णपणे थांबवावे व तातडीने दुरुस्ती सुरु करण्यात यावी, उन्हाळी हंगाम असल्याने आवर्तनात खंड पडू देऊ नये तसेच तहसीलदार, प्रांताधिकारी यांच्याशी संपर्क करून नुकसान झालेल्या शेती पिकांचे पंचनामे करण्यात यावेत, अशा सूचना दिल्या.
दरम्यान, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे सूचनेनुसार भाजपचे पुणे जिल्हा सचिव तानाजी थोरात यांचेसह संग्रामसिंह निंबाळकर, लालासाहेब सपकाळ, बाबा निंबाळकर, प्रताप रायते, संतोष चव्हाण, मनोज पवार, सागर गुप्ते, काकासाहेब भाग्यवंत, मधुकर सरगर, बाळासाहेब नेवसे, माऊली नलवडे, महेश रायते, नागेश रायते, सुरेश खोपडे, कविराज निंबाळकर आदीसह भाजप कार्यकर्त्यांनी घटनास्थळी भेट दिली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
Indapur News : इंदापूर महाविद्यालयात शैक्षणिक धोरण चर्चा सत्र संपन्न
Indapur News : दहावीतील १६ वर्षीय विद्यार्थिनीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
Indapur News : जाती-पातीच्या पलिकडे जाऊन शिवराय समजून घेणे गरजेचे : मनोज पाटील