दीपक खिलारे
(Indapur News) इंदापूर : इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयामध्ये राज्याचे माजी मंत्री व संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या प्रेरणेतून आणि प्राचार्य प्रा. डॉ. जीवन सरवदे यांच्या मार्गदर्शनाखाली शाहीर अमर शेख सभागृहामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 याविषयावर डॉ. शिवाजी वीर यांचे व्याख्यान आणि चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.
चर्चासत्रात महाविद्यालयाचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी सहभागी
10 आणि 11 मार्च 2023 रोजी या दिवसा दरम्यान चर्चासत्र पार पडले. या चर्चासत्रात महाविद्यालयाचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी सहभागी होते. डॉ. शिवाजी वीर यांना संसाधन व्यक्ती म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी उच्च शिक्षणातील रचनात्मक बदल, उच्च शिक्षण अभ्यासक्रमातील बदल, शिकविण्याच्या अभिनव पद्धती, मूल्यमापणातील सुधारणा, संस्थेचा विकास आराखडा, राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीमध्ये विविध शैक्षणिक घटकांची भूमिका या सर्व मुद्द्यांवर मार्गदर्शन केले.
या चर्चासत्रामध्ये कार्यभारातील बदल, पदभरती, शिक्षण पद्धतीतील रचनात्मक आणि शैक्षणिक बदलाचे परिणाम, कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमाची गरज अशा अनेक विषयांवर चर्चा झाली.
या व्याख्यानाचे आणि चर्चासत्राचे आयोजन आयक्यूएसीचे समन्वयक डॉ. संदिप शिंदे यांनी केले होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Indapur News : इंदापूर न्यायालयात जमीन मोजणीविषयी मार्गदर्शन
Bhigvan News : तक्रारवाडीच्या पिरसाहेब ऊरुस उद्या (सोमवार) पासून!