(Baramati Crime) दौंड : बारामती तालुक्यातील एटीएम चोरीत वापरलेली बोलेरो जीपही चोरीचीच निघाल्याचे आज उघडकीस आले आहे. रावणगाव पोलिसांना पुणे सोलापूर महामार्गावर ही जीप सापडली आहे. शुक्रवारी (ता. १०) बारामती तालुक्यातील Baramati Crime सुपे येथे अज्ञात चोरट्यांनी तब्बल सात लाख १४ हजार रुपये रक्कम असलेली एटीएम मशीनच चोरुन नेली होती.
एटीएम मशीन रावणगाव- बोरीबेल रस्त्यावरील गटारात टाकली…!
दरम्यान, चोरट्यांनी ती एटीएम मशीन रावणगाव- बोरीबेल रस्त्यावरील गटारात टाकून चारचाकी वाहनासह पलायन केले होते. या चोरीसाठी वापरण्यात आलेली बोलेरो जीप ही या चोरांनी सासवड येथून चोरून नेल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर खडकी हद्दीत ही जीप रावणगाव पोलिसांना मिळाली आहे. ही माहिती दौंड पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील आणि वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काळे यांनी दिली आहे.
बारामतील सुपे येथे बस स्थानक परिसरात इंडी कॅश कंपनीचे एटीएम सेंटर आहे. हे एटीएम मशीन शुक्रवारी (दि.१०) रोजी चोरट्यांनी गॅस कटरने तोडून चाकी वाहनातून पलायन केले होते. या चोरट्यांनी चालू वाहनातच मशीन फोडले. आणि पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून ते रावणगाव- बोरीबेलच्या दिशेने चालले होते. त्यांनी रावणगाव- बोरीबेल रस्त्यावरील घाटात गाडी थांबविली. व चोरीचे एटीएम मशीन हे गटारात लपवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना तेथील ग्रामस्थांनी बघीतले. त्यावेळी घाबरेल्या चोरट्यांनी एटीएम मशीन तिथेच टाकून घटनास्थळावरून पळ काढला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी या एटीएम मशीन चोरीसाठी वापरलेली बोलेरो जीप रावणगाव पोलिसांना शनिवारी (दि.११) सकाळी अकरा वाजण्याच्या आसपास पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर खडकी हद्दीत सापडली. रावणगाव पोलीस चौकीचे पोलीस हवालदार गोरख मलगुंडे त्यांना माहिती मिळतात त्यांनी ही जीप ताब्यात घेतली. दौंड पोलिसांनी या घटनेच्या तपासासाठी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिली आहे.
याबाबत बोलताना वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काळे म्हणाले की, दौंड पोलिसांकडून या गुन्ह्यात वापरलेली बोलोरो जीप ताब्यात घेतली आहे, या चोरांनी सासवड येथून ही गाडी चोरुन नेली होती. याबाबत सासवड पोलीस ठाण्यात ही जीप चोरीला गेल्याचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास सुरू असून एटीएम चोरीतील छडा लावून आरोपींना जेरबंद केले जाईल.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेत गदारोळ!
Sharad Pawar : गळ्यात कांद्याच्या माळा घालणारे भाजपवाले कुठे गेले ?? शरद पवारांचा सवाल!