इंदापूर : Indapur News : रंगपंचमी दिवशी आपल्या मैत्रिणीबरोबर रंग खेळून झाल्यावर गप्पा मारत बसल्यानंतर अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका (heart attack) आल्याने दहावीत (class 10 )शिकणाऱ्या एका १६ वर्षीय विद्यार्थिनीचा (A 16-year-old student ) जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. रविवारी (ता. १२) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास इंदापुरात (Indapur News) ही घटना घडली आहे. (Indapur News)
सृष्टी सुरेश एकाड वय १६ वर्ष रा.जाधव वस्ती नजीक, सरडेवाडी (ता.इंदापूर जि.पुणे) असं मयत विद्यार्थ्यांनीचं नाव आहे.
इंदापूर तालुक्यातील सरडेवाडी येथील घटना..!
मिळालेल्या माहितीनुसार, सृष्टी एकाड ही इंदापूर तालुक्यातील सरडेवाडी गावातील जाधव वस्ती नजीक आपल्या कुटुंबीयांसमवेत राहण्यास होती. रविवारी 12 मार्च रोजी रंगपंचमीच्या सणा निमित्ताने आपल्या मैत्रिणींबरोबर एकमेकींना रंग लावून तिने रंगपंचमीचा आनंद देखील घेतला. मुक्तछंदपणे नैसर्गिक रंगांची उधळण केल्यानंतर ती आपल्या मैत्रिणींबरोबर हसत खेळत बागडत होती. मात्र याच वेळी अचानक सायंकाळी सात वाजताच्या दरम्यान तिला तीव्र हृदयविकाराचा झटका आला. चुलते सचिन एकाड आणि मनोज चित्राव यांनी लागलीच तिला उपचार कामी इंदापूर शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल केले मात्र तपासणी अंती डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
सृष्टी ही इंदापूर शहरातील नारायणदास रामदास हायस्कूल मध्ये इयत्ता दहावीच्या वर्गात शिकत होती. अत्यंत मनमिळाऊ स्वभाव अभ्यासामध्ये अतिशय हुशार आणि विविध शालेय स्पर्धांमध्ये तिचा सहभाग असायचा. सध्या दहावीच्या परीक्षा सुरू आहेत, सोमवारी 13 मार्च रोजी दहावीचा अखेरचा पेपर देण्यापूर्वीच तिचे दु:खद निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.