Weather News :राज्यात उन्हाच्या झळांची तीव्रता वाढू लागली आहे. त्यामुळे सोमवारनंतर राज्यातील काही भागांमध्ये पाऊस पुन्हा हजेरी लावणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे.
शनिवारी कोकण आणि गोव्यात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ झाली, तर उर्वरित ठिकाणी कमाल तापमान सरासरीच्या नजीक पोहोचले आहे. सांताक्रूझ (मुंबई) येथे सर्वाधिक ३७.५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची, तर पुण्यात १४.७ एवढय़ा सर्वात कमी किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
कोकण आणि गोव्यात तुरळक तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाच्या हलक्या सरी पडतील.
पुणे आणि आसपासच्या परिसरात मंगळवार ते शुक्रवार-दरम्यान दुपारनंतर आकाश ढगाळ असेल. तसेच विजांचा कडकडाट, मेघगर्जनेसह पावसाच्या हलक्या सरींचा अंदाज आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
पुण्यात दोन दिवस पुन्हा धो धो पाऊस बरसणार
उरुळी कांचन परिसरात मोकाट फिरणाऱ्या तरुणांवर लोणी काळभोर पोलिसांची कारवाई..!