(Pune Crime) पुणे : किरकोळ कारणांवरून एकास लोखंडी रॉडने बेदम मारहाण करण्यात आल्याचा प्रकार पुण्यातील (Pune Crime) येरवडा येथील गांधीनगर भागातून समोर आला आहे. वाद असणाऱ्या तसेच प्रतिस्पर्धी तरुणासोबत फिरत असल्याच्या कारणावरून ही मारहाण करण्यात आली आहे. हा प्रकार दुपारी अडीचच्या सुमारास घडला.
१७ वर्षीय मुलावर गुन्हा दाखल…
याप्रकरणी रोनाल्ड बनसोडे (वय २९) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यावरून चेतन बनसोडे (वय १९) याच्यासह १७ वर्षीय मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोनाल्ड व चेतन यांची तोंडओळख आहे. चेतन याचे एका तरुणाशी वाद आहेत. त्याचरुणासोबत रोनाल्ड फिरतो याचा राग आरोपींच्या मनात होता.
दरम्यान, दोघांनी त्याला दुपारी अडविले. तसेच तु त्याच्यासोबत का फिरतो असे म्हणत वाद घातला. त्यानंतर त्याला बेदम मारहाण केली. तसेच, लोखंडी रॉडने मारून गंभीररित्या जखमी केले. पुढील तपास पोलीस करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
येरवडा येथे टोळक्याचा राडा! तरुणाला केली बेदम मारहाण
येरवडा येथील मोक्कामधील आरोपीला जामीन..!
येरवडा कारागृहात तीन कैद्यांचा मृत्यू ; कारागृहाबाहेर नातेवाईकांचा गोंधळ