संतोष पारधी
(Pune News): वाकी बुद्रुक (ता.खेड) : जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता १ली ते ४थीच्या वर्गातील विद्यार्थ्यांचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे झाले.
सांस्कृतिक कार्यक्रमात नृत्ये, नाट्ये सादर…!
उद्घाटन वाकी गावचे सरपंच वैशाली जरे, उपसरपंच संतोष गारगोटे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शरद टोपे, उपाध्यक्ष अर्चना टोपे, माजी सरपंच पप्पुदादा टोपे, योगेश गारगोटे, राहूल कड, भानुदास टोपे, राजू टोपे, कल्याणी टोपे, रुक्मिणी येवले, कोमल निगडे, धनंजय, सुभाष टोपे, गिरीश टोपे आणि पालकवर्ग उपस्थित होते. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमात नृत्ये,नाट्ये सादर केली.
या कार्यक्रमाचे नृत्य दिग्दर्शन योगेश जाधव, अक्षता टिपरे, सुकन्या, सुप्रिया जाधव यांनी केले. ताजवे सर यांनी सूत्रसंचालन केले. सांडभोर मॅडम यांनी विद्यार्थ्यांची उत्कृष्ट वेशभूषा केली. सांगडे सर यांनी तांत्रिक गोष्टी पाहिल्या. स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे नियोजन शाळेचे मुख्याध्यापक भरत गोपीनाथ ताजवे, सांगडे सर, सांडभोर मॅडम यांनी केले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
मनोरंजन विश्वाला मोठा धक्का; कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे निधन
Sharad Pawar : गळ्यात कांद्याच्या माळा घालणारे भाजपवाले कुठे गेले ?? शरद पवारांचा सवाल!